Ad will apear here
Next
२२ फेब्रुवारीला कारकीर्द सुरू करणारे दोन नेते

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातले ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. २२ फेब्रुवारी १९६७ या दिवशी पवार हे बारामती मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने विधानसभेवर निवडून गेले होते. विशेष योगायोग म्हणजे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही २२ फेब्रुवारीलाच झाली आहे. २२ फेब्रुवारी १९९२ ला देवेंद्र फडणवीस हे नागपूर महानगरपलिकेत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 
शरद पवार पहिल्यांदा निवडून आले तेव्हा त्यांचे वय २७ वर्षे होते, तर फडणवीस पहिल्यांदा निवडून आले तेव्हा २२ वर्षांचे होते. पवार यांना तरुणपदी मंत्रिपद मिळाले. फडणवीस हे १९९७मध्ये तरुण वयातच नागपूरचे महापौर म्हणून निवडून आले. पवारांना ३८व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रिपद पहिल्यांदा मिळाले. फडणवीस यांना ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. पवार यांनी चारदा मुख्यमंत्रिपद, तर केंद्रात संरक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषविले. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे.
'संसदीय राजकारणात पाच दशकांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करणारे शरद पवार यांच्या नेतृत्व व कर्तृत्वाबद्दल आपणास अभिमान वाटतो,' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टि्वटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

दोन्ही लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीस २२ फेब्रुवारीला सुरुवात झाली. अर्थात दोघेही निवडून येण्यातील अंतर हे तब्बल २५ वर्षांचे आहे. एक आमदार म्हणून, तर दुसरे नगरसेवक म्हणून निवडून आले. योगायोग किंवा अन्य काही असो, पण पुढे दोघेही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले व तेही उभयतांना तरुण वयातच मिळाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GWNBAZ
Similar Posts
शिवसेना-भाजप खासदार युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर! अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार आज पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. केंद्रीय   या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे
राज्यभरात बारावीच्या परीक्षांना सुरूवात राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे १५ लाख ५ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील एकूण ९ हजार १४३ ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी ही परीक्षा देतील. मुख्यमंत्री
संक्रमण काळातही माध्यमांनी मूल्याधिष्ठित व्यवस्था विकसित करावी मुंबई : ‘आपल्याकडची माध्यमव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या काळातून जात आहे. विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने माध्यमांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे सर्व आव्हाने स्वीकारून स्वतःची मूल्ये स्वतः तयार केली आहेत, तशीच मूल्याधिष्ठित व्यवस्था आजच्या बदललेल्या, नव्या युगातही तयार केली पाहिजे आणि माध्यमे ती करतील,
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language